Pimpri : ‘या’ कामाचा वाया गेलेला खर्च अभियंता, सल्लागार, ठेकेदाराकडून वसूल करा – रमेश वाघेरे

एमपीसी न्यूज – छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याला (Pimpri) आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. परंतु, चबुतरा बनवण्यासाठी आतापर्यंत पाच कोटी रुपये खर्च झाला आहे. आता ती जागा बदलून दुसऱ्या जागेत चबुतरा केला जाईल. त्यामुळे अगोदरच्या जागेवरील वाया गेलेला पाच कोटी रुपयांचा खर्च संबंधित अभियंता सल्लागार व ठेकेदार यांच्याकडून वसूल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. महापालिकेच्या वतीने मोशी बोऱ्हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी चबुतरा बनवण्यासाठी आतापर्यंत पाच कोटी रुपये खर्च झाला आहे व आता ती जागा बदलून दुसऱ्या जागेत चबुतरा बनवला जाणार आहे. त्यासाठी पुन्हा पंधरा कोटी रुपये खर्च येणार आहे मात्र पुतळ्याची जागाच चुकीची निवडल्यामुळे व ठेकेदाराने काम करण्यास उशीर लावल्याने करदात्या (Pimpri) नागरिकांचे पाच कोटी रुपये वाया गेले आहेत.

Pimpri : टीडीआर घोटाळा, संभाजी ब्रिगेडचे मंगळवारपासून बेमुदत साखळी उपोषण

त्यामुळे या पुतळ्यासंबंधीत स्थापत्य विभागाचे शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सल्लागार व वेळेत काम पूर्ण करू न शकलेल्या ठेकेदार यांच्याकडून वाया गेलेला पाच कोटी रुपयांचा खर्च वसूल करण्यात यावा असे न केल्यास करदात्यांच्या कराचे करोडो रुपये वाया घालवले म्हणून आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागू याची नोंद घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.