Pimpri: ‘राईज अँड शाईन’ कंपनीने दिला 1000 गरजू कुटूंबांना मदतीचा हात

Pimpri: 'Rise and Shine' company gives a helping hand to 1000 needy families

एमपीसी न्यूज- लॉकडाउनमुळे सामान्य कुटूंबाची परवड होत आहे. रोजगार बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ‘राईज अँड शाईन’ कंपनीने 1000 गरजू कुटूंबांना मदतीचा हात दिला आहे.

टिश्यू कल्चर क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य असणारी ‘राईज अँड शाईन बायोटेक’ या कंपनीने सामाजिक जबाबदारीचे भान जपत हातावर पोट भरणाऱ्या 1000 गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.

कंपनीकडून या कुटुंबांना आवश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीच्या संचालिका डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते हे अन्नधान्य किट कुटूंबातील प्रमुखाना देण्यात आले आहे.

कंपनी कडून याअगोदर एप्रिल महिन्यात 900 कंपनीतील कामगार व नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप केले होते.

काही दानशूर व खऱ्या अर्थाने हृदयापासून कळवळा असणारी माणसे या जगात आहेत. ज्यांनी केवळ लोकांच्या चेहऱ्यावरचे आसू पुसून हसू फुलवले आहे, यामध्ये डॉ. भाग्यश्री पाटील त्यातीलच एक यापूर्वीही त्यांनी अनेक वेळेला मदतीचा हात पुढे करत दीनदुबळ्याना या संकट समयी धीर देत त्याच्या अडचणी समजून मदत केली आहे.

आजच्या या प्रसंगी त्या धावून आल्या त्याचे मनापासून आभार, असे मत मदत लाभलेल्या एका कुटुंबाने व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.