Pimpri : महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहिणी खडसे यांचा शहर राष्ट्रवादीकडून सत्कार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड (Pimpri) झाल्याबद्दल रोहिणी खडसे यांचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीकडून सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी समिती व शहरातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला.

PCMC : महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची बदली

यावेळी विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते, समिती सदस्य देवेंद्र तायडे, राजन नायर, मौलाना अब्दुल गफार (Pimpri ) आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.