Pune : नितीन म्हस्के खून प्रकरणी मुख्य आरोपीसह 19 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) मंगला थिएटरबाहेर खून झालेल्या नितीन म्हस्केच्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. नितीन म्हस्के खून प्रकरणातील यल्ल्या उर्फ सागर कोळणटी हा मुख्य आरोपी होता.  

15 ऑगस्टच्या रात्री नितीन म्हस्के (35, रा. ताडीवाला रोड) या सराईत गुंडांचा तलवार, कोयता, लोखंडी गड आणि दगडाने मारहाण करत तब्बल 20 जणांनी निर्घृण खून केला. हे आरोपी खून करून आरोपी पसार झाले होते.

गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक तपासाच्या (Pune ) आधारे कर्नाटकातील हुडगी या गावातून, पुणे जिल्ह्यातील चौफुला आणि विश्रांतवाडी परिसरातून सर्व आरोपीना अटक केली तर आता यल्ल्या आणि त्याच्या इतर 19 साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

Pimpri : महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहिणी खडसे यांचा शहर राष्ट्रवादीकडून सत्कार

सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड असे आरोपींचे नाव असून या सगळ्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती

या सगळ्यांवर आता संघटित गुन्हेगारी केल्याप्रकरणी मोक्का लावण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.