Vadgaon Maval : नगरसेवक प्रवीण चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून न्यू इंग्लिश स्कूलला स्वच्छतागृह मिळाले

एमपीसी न्यूज – महिंद्रा एक्सलो या कंपनीने (Vadgaon Maval) सामाजिक उत्तरदायित्व या निधीतून न्यु इंग्लिश स्कूल वडगाव मावळ येथे सुमारे 10 लाख रुपये खर्च करून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिले. या स्वच्छतागृहाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि.30) संपन्न झाला. या शाळेत 689 विद्यार्थिनी शिक्षण घेतात. शाळेचे माजी विद्यार्थी आणि वडगावचे नगरसेवक प्रवीण चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला.

न्यु इंग्लिश स्कूल वडगाव मावळ येथे मावळ तालुक्यातील अग्रगण्य अशा महिंद्रा एक्सलो या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व या निधीतून विद्यालयातील 689 विद्यार्थीनींसाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च करून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिले.
आज रोजी हा लोकार्पण समारंभ संपन्न झाला.

याप्रसंगी कमर्शिअल महिंद्रा अक्सेलो कंपनीचे व्हा. प्रेसिडेंट दिवाकर (Vadgaon Maval) श्रीवास्तव, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मनोज ढोरे,नगरसेवक प्रवीण चव्हाण, निवास गांधाले, प्रशांत चाटप, अभिजित जाधव, नितीन वेदपाठक, जगदीश परब, सूर्यकांत महामुनी आदि मान्यवर उपस्थित होते.

शाळेचे माजी विद्यार्थी आणि नगरसेवक प्रविण चव्हाण यांच्या विशेष सहकार्यातून आणि पाठपुराव्यातून हाप्रकल्प साकारण्यात आला. पाण्याचा किमान वापर, जास्तीत जास्त स्वच्छता आणि निरोगी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असे अद्यावत स्वच्छतागृह आहे.

नगरसेवक प्रवीण चव्हाण यांच्या माध्यमातून आणि पाठपुराव्यातूनच नुकतेच सुमारे 3 लाख रुपये खर्चाच्या सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन हे देखील याच शाळेला महिंद्रा कंपनीच्या माध्यमातूनच बसवण्यात आली.

महिंद्रा एक्सलो कंपनीच्या इतर कर्मचारी वृंदांच्या माध्यमातून न्यू इंग्लिश शाळेच्या नुकत्याच बदलण्यात आलेल्या गणवेशासाठी 11 गरजू विद्यार्थिनींसाठी आर्थिक मदत देखील देण्यात आली.

Pune : नितीन म्हस्के खून प्रकरणी मुख्य आरोपीसह 19 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

या कायमस्वरूपी प्रकल्पाचे उद्घाटन महिंद्रा एक्सलो कंपनीचे व्हा. प्रेसिडेंट दिवाकर श्रीवास्तव यांनी केले आणि आपल्या मनोगतामध्ये स्वच्छतेचे, तसेच डिजिटल क्लासरूमचे महत्त्व सांगीतले.निवास गांधाले यांनी या प्रकल्पाची माहिती दिली

नगरसेवक प्रविण चव्हाण यांनी महिन्द्रा एक्सेलो कंपनीने विद्यालयाला केलेल्या मदतीबद्दल आभार मानत यापुढे देखील शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

किसन रत्नपारखी व मनोज ढोरे यांनी महिंन्द्रा सारख्या कंपनीची अनेक सामाजिक उपक्रमांसाठी गरज आहे, त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे हे नमूद केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी कलादालनालाही भेट दिली.

प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका प्रज्ञा गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी आडकर यांनी केले,आभार प्रदर्शन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री लेंभे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार फडतरे, गणेश शेंडगे, प्रविण ढवळे, राजेंद्र आडमुठे, अरविंद ढाकणे, शोभा ,सुर्यवंशी, जयश्री कदम, दिनेश मोरमारे यांनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.