Chikhali : हार्डवेअर दुकानात आग लागताच महावितरणकडून वीजपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – पूर्णानगर चिखली (Chikhali ) येथील सचिन हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रिकल्सच्या दुकानात बुधवारी (दि. 30) पहाटे आग लागली. आग लागल्यानंतर महावितरणकडून तात्काळ विजपुरवठा खंडित करण्यात आला. दुकानातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चिमणाराम चौधरी (वय 45), ज्ञानुदेवी चौधरी (वय 40), सचिन चौधरी (वय 10), भावेश चौधरी (वय 15) या चौघांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. आगीबाबत माहिती मिळताच पहाटे सहा वाजताच्या सुमारास इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Vadgaon Maval : नगरसेवक प्रवीण चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून न्यू इंग्लिश स्कूलला स्वच्छतागृह मिळाले

यात महावितरणकडून दुकानात लावलेल्या मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत असल्याचे तसेच वीजमीटर व सर्व्हिस वायर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. सोबतच महावितरणच्या यंत्रणेमधून कोणत्याही प्रकारचे शॉर्टसर्किट झाले नसल्याचे या प्राथमिक पाहणीत आढळून आले.

दुकानातील आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची (Chikhali) शंका व्यक्त होत असल्याने राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेची पुढील चौकशी विविध सरकारी यंत्रणेच्या संयुक्त समितीकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.