Talegaon Dabhade : श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमीत्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

Chikhali : हार्डवेअर दुकानात आग लागताच महावितरणकडून वीजपुरवठा बंद

बुधवारी सकाळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे पुजन व दीपप्रज्वलन संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वस्त व्यवस्थापक हभप ज्ञानेश्वर महाराज माऊली दाभाडे व यतिनभाई शहा, उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल फाकटकर यांनी स्वागत केले.

श्री विठ्ठल मंदिरात पहाटे पुजा, काकड आरती, भजन, महापूजा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ प्रवचन, किर्तन व जागर कार्यक्रम संपन्न झाले. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे नेतृत्व हभप निवृत्ती महाराज फाकटकर हे करीत आहेत. मोठ्या संख्येने भाविक पारायणाला बसले आहेत.

श्री विठ्ठल मंदिर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल फाकटकर,कार्याध्यक्ष भगवान भेगडे, चिटणीस किरण गवारे, खजिनदार प्रशांत दाभाडे, भोजन व्यवस्थापक प्रमुख रविंद हांडे पाटील, हरिदास वनारसे, अतुल देशपांडे, किशोर दरेकर आणि भजनकरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. यानिमित्ताने संपुर्ण मंदिराला आकर्षक अशी विजेची रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच उत्तम रांगोळया काढण्यात आलेल्या आहेत. तर भाविकांची श्रवणासाठी मोठी गर्दी होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.