Pune : नितीन म्हस्के खून प्रकरणातील 17 आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune) मंगला थिएटरबाहेर 15 ऑगस्टच्या रात्री नितीन मोहन म्हस्के (35, रा. ताडीवाला रोड) या सराईत गुंडांचा तलवार, कोयता, लोखंडी गड आणि दगडाने मारहाण करत निर्घृण खून करण्यात आला होता. खून करून आरोपी पसार झाले होते. तर, मारेकरी अटक न झाल्याने मयताचे नातेवाईक आक्रमक झाले होते.

Chinchwad : रोटरीच्या युथ एक्सचेंज प्रोग्रामद्वारे युवकांना सामाजिक, सांस्कृतिक आदानप्रदान करण्याची संधी

दरम्यान यातील 17 आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक तपासाच्या आधारे कर्नाटकातील हुडगी या गावातून, पुणे जिल्ह्यातील चौफुला आणि विश्रांतवाडी परिसरातून ताब्यात घेतले.

सागर ऊर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी (35),साहिल उर्फ सल्ल्या मनाेहर कांबळे (20), गणेश शिवाजी चाैधरी (24), राेहित बालाजी बंडगर (20), सुशील अच्युतराव सुर्यवंशी (27), शशांक ऊर्फ वृषभ संताेष बेंगळे (21), गुडगप्पा फकीरप्पा भागराई (28), मलेश ऊर्फ मल्ल्या शिवराज काेळी (24), किशाेर संभाजी पात्रे (20, सर्व रा. ताडीवाला राेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. मयत नितीन म्हस्केचा मित्र सतिश आनंदा वानखेडे याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 15 ऑगस्टच्या रात्री नितीन म्हस्के हा मंगला टॉकीज येथे रात्रीचा सिनेमा पाहून मित्रासोबत घरी जात होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले.

घातक शस्त्रांनी त्याच्यावर वार करत त्याला ठार मारले. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गुन्ह्यातील मुख्य आराेपी सागर यल्ल्या व त्याचे साथीदार हे लातुर, साेलापूर, काेल्हापूर, पुणे ग्रामीण व पुणे शहर परिसरात तसेच कर्नाटक येथील हुडगी, बेळगाव मध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी त्या त्या गावात जाऊन आरोपींना अटक केली.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दुर्गम भागातून पाच आराेपींना अटक केली. तर उर्वरित पाच आरोपी पुण्यातील विश्रांतवाडी, पुणे ग्रामीण मधील चाैफुला येथून जेरबंद करण्यात आले. याशिवाय दोन आराेपी विवेक भोलनाथ नवघणे (२५, रा. रामवाडी) व इम्रान हमीद शेख (३१, रा. केशवनगर) यांना पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांचे पथकाने मुंढवा परिसरातील केशवनगर मधून अटक केली. अटक करण्यात आलेले दहा आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.