Pune : पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई; दिल्लीत छापा मारुन 1200 कोटींचे 600 किलो एम डी ड्रग्ज केले जप्त

पुणे पोलिसांचे पुणे, कुरकुंभ सह दिल्लीत छापेमारी

एमपीसी न्यूज –   पुणे शहर पोलिस दलाने गेल्या दोन दिवसात ( Pune)  विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे केलेल्या कारवाई करुन तब्बल 2 हजार 200 कोटी रुपयांचे 1100  किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत.काल दि .20 रोजी गुन्हें शाखेच्या एका पथकाने दिल्लीत कारवाई करुन 400 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते . तर  आज दि .21  रोजी पुन्हा एका पथकाने दिल्लीत छापा मारुन 1200 कोटींचे 600 किलो एम डी ड्रग्ज जप्त केले.  पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई आहे. 

गुन्हे शाखेने सोमवारी सराईत गुन्हेगार वैभव ऊर्फ पिंट्या माने व त्याच्या साथीदारांना पकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज पकडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन विश्रांतवाडी येथील भैरव नगर मध्ये असलेल्या एका गोदामामधून 55 किलो ड्रग्जचा साठा आढळून आला. त्यानंतर दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम या कारखान्यावर छापा घातला. या ठिकाणी एमडीची निर्मिती केली जात होती. येथून पोलिसांनी जवळपास 600 किलोपेक्षा अधिक एम डी जप्त केले आहे. पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार येथे 1800 किलोची निर्मिमीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

Pimpri : शहरातील 21 हजार 500 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा; आज इंग्रजीचा पेपर

या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी आहेत. आजवर पकडण्यात आलेल्या एमडी पैकी हे सर्वात सुपर फाईन क्वालिटीचे एमडी असल्याचे पोलिसांनी सांगितले, कुरकुंभ येथे तयार केलेले ड्रग्ज मुंबई, मीरा भाईंदर, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि नेपाळ मार्ग परदेशात पाठविले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेची पथके वेगवेगळ्या राज्यात रवाना झाली आहेत. त्यातूनच काल  दिल्ली येथे कारवाई करुन   440 कोटींचे  तर आज 1200 कोटींचे 600 किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याची व्याप्ती आणखी वाढण्याची ( Pune)  शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.