Pimpri : छत्रपती शाहू महाराजांना रिपाइंचे अभिवादन

Rpi's tribute to Chhatrapati Shahu Maharaj

एमपीसीन्यूज : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ( आठवले गट) वतीने केएसबी चौक, चिंचवड येथील शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब भागवत आणि रिपाइं अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ख्वाजाभाई शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

रिपाइं कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद चांदमारे, अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष शेखलाल नदाफ, कुणाल वाव्हळकर, रिपाइं शहर सल्लागार विकास चव्हाण, अक्षय कसबे, दावल नदाफ, बाळासाहेब काळे, आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.