Pimpri:गांजा विक्री करणा-या एकाला अटक 

एमपीसी न्यूज – बेकायदा गांजा विक्रीप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज (शनिवारी) पिंपरी येथे एकाला अटक केली. त्याच्याकडून सुमारे सव्वा तीन लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

रोहीत सुनील मछले (वय-25, रा. भाटनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई धस यांना बेकायदा गांजा विक्रीबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून पिंपरीगावाकडे जाणा-या डेअरी फार्म रस्त्यावर रोहीत हा संशयास्पदरित्या आढळून आला.

त्याच्याकडील पांढ-या पोत्यांची पाहणी केली. असता त्यात गांजा असल्याचे आढळून आले. 21 किलो 833 ग्रॅम गांजा आढळून आला. 3 लाख 27 हजार 900 रुपये किंमतीचा हा गांजा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.