Wakad: टोळक्याकडून रिक्षाचालकावर कोयत्याने वार 

एमपीसी न्यूज – चार जणांच्या टोळक्याने विनाकारण शिवीगाळ करत रिक्षा चालकावर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि.28) संध्याकाळी साडे पाच वाजता रहाटणी फाटा येथे घडली.

याप्रकरणी शुभम काटे, पवन मंडलिक, दिलीप कसर, अमोल कसर (सर्व रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विरशेट्टी विश्‍वनाथ ठाकुर (वय-27 रा. रहाटणी फाटा)यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूर हे रहाटणी फाटा येथे मित्रा सोबत बोलत थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी विनाकारण शिवीगाळ करत ठाकूर यांना हाताने मारहाण केली .  ठाकूर तेथून पळून जाऊ लागले. त्यावेळी शुभम काटे याने शर्टच्या आत लपविलेला कोयता काढून ठाकुर यांच्या डोक्‍यात वार केले. वाकड पोलीस पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.