Pimpri : संत सूरदास यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांगाचा सत्कार

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या चिंचवड येथील मोरया प्रागंणात संघपरिवारातील दिव्यांगासाठी कार्य करणारी सक्षम संस्था यांच्या वतीने संत सूरदास यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी सक्षम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद माधव कसबेकर, प्रांत सचिव महेश टांकसाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मीठभाकरे होते. डॉ. मिलिंद कसबेकर यांनी संत सूरदास यांची माहिती प्रेक्षकांना सांगून सक्षम संस्थेचा कार्यविस्तार व त्या कार्यामागील भूमिका सांगितली. वैशिष्ट्यपूर्ण कार्य केल्याबद्दल काही दिव्यांगाचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत माधव आपटे यांनी केले. संजय वडापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. उमर्जीकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. शिरीष जतकर यांनी संघ गीत सादर केले. भीमाजी वडेर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.