Pimpri : ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ मोहिमेची दुसरी फेरी

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri) कार्यक्षेत्रामध्ये “विशेष मिशन इंद्रधनुष मोहिम” 2023 राबविण्यात येत आहे. पहिली फेरी (Pimpri) ऑगस्टमध्ये पूर्ण झाली. दुसरी फेरी 11 ते  16सप्टेंबर तर तिसरी फेरी 09  ते 14 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे.

बालकामधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यु पावतात तसेच केंद्रशासनाने डिसेंबर 2023पर्यत गोवर रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे धेय निश्चित केले आहे.

Pune : गणरायाच्या आगमनाला लागणार पावसाची हजेरी, राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे

यासाठी केंद्र शासनाने  ऑगस्ट 2023 पासून 3  फे-यांमध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकामध्ये “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 ” कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत (Pimpri) लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर माता यांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करणेबाबत सुचित करण्यात आले आहे.

Pune : आंबेगाव येथे शरद पवारांची सभा झाल्यास त्यांचे स्वागत करण्यास निश्चित जाणार – दिलीप वळसे पाटील

अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये “विशेष मिशन इंद्रधनुष मोहिम” 2023 राबविण्यात येत आहे. पहिली फेरी ऑगस्ट 23  मध्ये पूर्ण झाली आहे. दुसरी फेरी  16 सप्टेंबरपर्यंत तर तिसरी फेरी 09 ते 14  ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे.

या मोहिमे संदर्भात दिनांक 4 व 5जुलै 2023 रोजी राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. 10 ते 15 जुलै 2023 या कालावधीत मनपातील जेष्ठ तसेच प्रभारी वैद्यकिय अधिकारी, पी.एच.एन, सिनिअर एएनएम, एएनएम व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.

सर्व नागरीकांनी आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे वयोगटानुसार लसीकरण झालेले नसल्यास त्यांनी आपल्या घराजवळील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालय अथवा  दवाखान्यातील वैद्यकिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन बालकांचे मोफत लसीकरण पुर्ण करुन घेऊन मोहिम यशस्वी (Pimpri) करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले (Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.