Pimpri: पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या; सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडीच्या घटना घडल्या असून यामध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

पहिल्या घटनेप्रकरणी रूपाकुमारी ललन तिवारी (वय 32, रा. वाटीका दिपकराम भालुराम, शनि मंदिरासमोर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 30 हजारांचा लॅपटॉप, 1500 रूपयांचे लिनोओ वाईब, 3800 रूपयांची रोकड चोरून नेली.

  • दुसर्‍या घटनेप्रकरणी सनी ज्ञानू शिरसाठ (वय-34, रा. भाजी मंडई शेजारी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणु रिंकु लोट (वय-27), लड्डू ऊर्फ हर्ष बहोत (वय-19), अक्षय ऊर्फ गबर्‍या सांगळे (वय-22), दिपक पप्पा खत्री (वय-19, सर्व रा. सेनेटरी चाळ, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून आरोपींनी 70 हजार रूपये किंमतीचा एलईडी चोरून घेऊन जात होते. फिर्यादी यांनी पाहिल्यानंतर आरोपींनी घरासमोर एलईडी टाकून पळ काढला. एलईडीचे नुकसान केले.

  • तिसर्‍या घटनेप्रकरणी भुजंग रंगनाथ गायकवाड (वय-059, रा. बौध्दनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर शनिवारी सकाळी ते रविवारी सकाळी साडेदहा या कालावधीत बंद होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.सुमारे 1 लाख 18 हजारांचे सोन्याचे दागिने, 2 लाखांची रोकड असा 3 लाख 18 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. तिन्ही घटनेत सुमारे 4 लाख 23 हजार 300 रूपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.