Pimpri : उड्डाणपूलाचा केला जर ‘असाही’ वापर; तर शहर होईल स्वच्छ-सुंदर

एमपीसी न्यूज : सध्या वाढत्या शहरीकरणामुळे खेळांच्या (Pimpri) मैदानाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. सध्या जागोजागी मेट्रो आणि महामार्गांमुळे ठिकठिकाणी मोठे उड्डाणपूल बांधले जात आहेत. या पूलांच्या खाली बरीच मोकळी जागा असते, त्याचा वापर योग्य रीतीने न केल्याने अनधिकृत दुकाने, झोपडपट्टीचे प्रमाण वाढून शहराच्या अस्वच्छतेत वाढ होत आहे. परंतु, याच जागेचा वापर समाजपयोगी कार्यासाठी करून शहरातल्या सौंदर्येत त्याचप्रमाणे तरुणांच्या खिलाडू वृत्तीमध्ये वाढ होण्यास मदत होईल. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी असाच एक व्हिडिओ शेयर करत या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. परंतु, आनंद महिंद्रा यांच्या आधीही गेले अनेक महीने पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमचे सदस्य प्रवीण आहिर या पूलांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेचा वापर समाजपयोगी कार्यासाठी व्हावा अशी मागणी करत आहेत.

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण सांगत आहे, की येथे पूलाखाली मुलांना बास्केटबॉल, क्रिकेट, टेनिस खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर बॉल बाहेर जाऊ नये यासाठी नेटही बसवण्यात आले आहे. तसेच येथील प्रवेश निशुल्क असल्याचे त्याने म्हंटले आहे.

प्रवीण आहिर यांनी देखील अशाच प्रकारची मागणी गेले अनेक दिवस करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये खेळाडू संख्या अधिक असली तरी येथे खेळांचे मैदान फार कमी उरले आहेत. खेळांसाठी मोकळे मैदान नसले तरी जी जागा पूलाखाली मोकळी आहे त्याचा वापर क्रीडा, वाचनालय, सांस्कृतिक उपक्रम ज्यामुळे तरूणांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण होईल अशा उपक्रमांसाठी वापरावी. या पूलांपासून बस स्टॉप, शाळा, मोठे महामार्ग जवळ असल्याने अनेक सोई-सुविधा पुरवण्यासाठी देखील याचा  करता येईल अशी मागणी प्रवीण आहिर यांनी पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमच्या (Pimpri) माध्यमातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.