Pimpri: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा काँग्रेसतर्फे गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागातर्फे ईद-ए-मिलाद निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा गौरव करण्यात आला. पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांचा सन्मान करण्यात आला.

पिंपरीत बुधवारी (दि.21) हा कार्यक्रम झाला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नजिम मुजावर, महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन एम.शेख, माजी महापौर कविचंद भाट, अॅड. पारित रिझवी, सेवादलाचे राज्य सरचिटणीस संग्राम तावडे, युवकचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, शहर सरचिटणीस सजी वर्की, सेवादलाचे मकरध्वज यादव, ज्येष्ठ नागरिक संघाचे लक्ष्मण रुपनवर, एनएसयुआयचे डॉ. वासिम इनामदार, व्ही.एम.कबीर, हर्षद ओव्हाळ, अब्दुल सादीर खान, वैभव गरुड आदी उपस्थित होते.

पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्यकेल्याबद्दल एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, शिक्षण क्षेत्रातील कार्याबाबत रजिया शेख आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबाबत ए.के. जाफर यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे शहाराध्यक्ष सचिन साठे यांचा हस्ते गौरव करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.