Pimpri : ‘आम्ही तुमच्यासाठी कार्यरत, तुम्ही राष्ट्रहितासाठी घरातच थांबा ; वाकड पोलिसांचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 21) ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे.  या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत ‘आम्ही तुमच्यासाठी कार्यरत आहोत, कृपया तुम्ही राष्ट्रहितासाठी घरातच थांबा’, असे आवाहन केले आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये वाकड पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचारी तोंडाला मास्क बांधून आणि हातात ‘आम्ही तुमच्या साठी कार्यरत आहोत, तुम्ही कृपया घरातच थांबा’, या आशयाचे पोस्टर घेऊन उभे आहेत. वाकड पोलिसांनी केलेल्या या आवाहनाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 21) ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत  घरातच राहण्याची सूचना पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.