Pimpri : महिलांनी स्वत:ला कमी समजू नये – डॉ. तारा भवाळकर 

एमपीसी  न्यूज –  सर्वच क्षेत्रात स्त्रियांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावेच लागतात. कारण पुरूष प्रधान व्यवस्थेमध्ये स्त्री कुठल्याही क्षेत्रात गेली तरी तिला स्वतःचं बळ फार मोठया प्रमाणावर खर्च करावं लागतं. ते लेखनाच्या क्षेत्रातही लावावे लागत आहे. बदलत्या जगात स्त्रियांनी स्वत:मध्ये इतका बदला केला आहे, की सर्वच क्षेत्रात त्यांचे अस्तित्त्व दिसत आहे. स्त्रियांचा हा टक्का वाढण्यासाठी आजच्या मुलींनी स्वत:ला कमी न समजता स्वत:ला सिद्ध करावे, असे परखड  मत लोकसाहित्याच्या अभ्यासक लेखिका डॉ. तारा भवाळकर यानी केले. 

आम्ही लेखिका संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनकुलकर्णी यानी संमेलनाचे उदघाटन केले.महिला साहित्यिकाना हक्काचे कायमस्वरूपी स्वतंत्र व्यासपीठ आम्ही लेखिका च्या रूपाने उपलब्ध झाले आहे.पुढील वर्षी पहिले अखिल भारतीय महिला साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे.त्याची पूर्व तयारी म्हणून हे ऑनलाईन लेखिका संमेलन आहे असे त्यानी यावेळी सांगितले. आम्ही लेखिका आयोजित पहिल्या ऑनलाईन लेखिका संमेलनात त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.

  • डॉ. तारा भवाळकर पुढे म्हणाल्या की, पुरूष प्राधान्य जपतजपत जेवढी स्त्री  शिकेल तेवढीच पूर्वी  स्त्री शिक्षणाची मर्यादा होती.आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही असे सांगून डाॅ तारा भवाळकर यानी  स्वातंत्र्य हे आपल्या जवळच आहे.ते आपल्याला कोणी देण्याची गोष्ट नाही.स्वतःबद्दल लिहिणं.बोलणं ही फार अवघड गोष्ट आहे त्यासाठी आपल्या अंतर्मनाचा गाभा सोलीव केळयाप्रमाणे सोलून काढावा लागतो.असा खणखणीत इषारा दिला.

आम्ही लेखिका आयोजित पाच दिवस चाललेल्या या पहिल्या ऑनलाईन लेखिका संमेलनातील गझल सत्रात ५४ गझलकारानी आपल्या गझला सादर  केल्या.   कवितांचे सत्र तर १५५ कवयित्रीनी गाजवले. ३२ ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्रींच्या मुलाखतीनी तिसरा दिवस संस्मरणीय ठरला. स्वतंत्र महिला साहित्य संमेलनाची गरज ४० लेखिकानी एका चर्चासत्रांत स्पष्ट केली.महिला साहित्यिकांच्या लेखनावर पुरूषसत्तेचा प्रभाव या विषयांवरील परिसंवादात ६९ महिला साहित्यिकांनी आपले विचार मांडले. प्रत्यक्ष साहित्य संमेलनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ मिळवून देणे अशक्यच असते. मात्र, ऑनलाईन लेखिका संमेलनात ते सहज शक्य झाले.

  • या ऑनलाईन लेखिका संमेलनाचा समारोप विश्वकोष निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डाॅ विजया वाड यानी केला.आपल्या भाषणाच्या  सुरवातीलाच त्यानी  एवढ्या मोठ्या प्रमाणात लेखिका आणि कवयित्री लिहित्या होत आहेत. बोलत्या होत आहेत यामुळे माझं ह्रदय भरुन आलंय असे सांगितले. जिच्या जवळ व्यथा आहे तिथे कथा आहे, असे सांगून त्या म्हणाल्या व्यथा आणि  वेदना बोलतं करतं ते साहित्य.स्त्रियांनी स्वतःला कमी लेखणं सोडून द्यावं आणि स्वतःसाठी जगायला शिकावं. अशा प्रेरक भाषणाने ऑनलाईन लेखिका संमेलनाचा समारोप झाला.

संगीता शेंबेकर यांच्या सुरेल आवाजातील  सरस्वती वंदना नंतर  स्वागताध्यक्षा गझलकारा सुनंदा पाटील यानी स्वागतपर भाषण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.