Pimpri : ‘ड्रग्स’ विक्री करणारा तरुण अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मॅफेड्रीन’ या ड्रग्सची विक्री करणाऱ्यास फुगेवाडी येथे अटक करण्यात आली. ही कारवाई अंमलीपदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. 2) फुगेवाडी येथे केली.

कौशिक बाबू वेगडा (वय 29, रा. मीरा भाईंदर, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी शहरामध्ये गस्त घालत असताना पोलीस शिपाई शैलेश मगर यांना माहिती मिळाली की, आरोपी वेगडा हा ड्रग्सची विक्री करण्यासाठी पिंपरी- चिंचवड शहरात आला असून तो फुगेवाडी येथील मेगा मार्ट मॉलजवळ ग्राहकाच्या प्रतीक्षेत थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन वेगडा यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 5 ग्रॅम आणि 5 मिली अशी ड्रग्सची दोन पाकिटे मिळून आली.

  • या दोन पाकिटांची बाजारात 30 हजार इतकी किंमत आहे. आरोपी वेगडा हा शहरात कोणाला ड्रग्सची विक्री करतो हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, कॉलेज परिसरात अशा ड्रग्सची विक्री होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस कर्मचारी प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, रमेश भिसे, संतोष दिघे, दिनकर भुजबळ, शैलेश मगर, दादा धस, प्रसाद जंगीलवाड, संतोष भालेराव, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.