Wakad : डांगे चौकातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ‘लेफ्ट फ्री सिग्नल’ सुरू

एमपीसी न्यूज – डांगे चौकातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चौकातील सिग्नल लेफ्ट फ्री करण्यात आले आहेत.

  • हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून डांगे चौकामध्ये वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक पोलीस असून देखील वाहनांच्या संख्येमुळे ही कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपाय करणे आवश्यक असल्याने डांगे चौकात लेफ्ट फ्री सिग्नल करण्यात आले आहे. यासाठी चौकामध्ये बॅरिकेट्‌स लावण्यात आले आहेत.

हिंजवडी हे सर्वात मोठे आयटी पार्क आहे. तिकडे जाणा-या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हिंजवडीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी वाहतूक विभागाला जादा मनुष्यबळ दिले आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यास मदत होत असल्याचेही पोलीस निरीक्षक म्हसवडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.