Nigadi : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. मुलीला गर्भधारणा झाल्याच्या दोन महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना निगडी येथे नोव्हेंबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. मुलीच्या घरामध्ये कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्या घरात जाऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीला गर्भधारणा झाली.

गर्भधारणेला दोन महिने झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक होळकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.