Nigdi News : निगडी -प्राधिकरणात 25 देशी वृक्षांची लागवड

एमपीसीन्यूज : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मित्र परिवार निगडी पुणे यांच्यावतीने निगडी-प्राधिकरण येथील डॉ. केशव हेडगेवार भवन शेजारी रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, राजेंद्र बाबर, नगरसेविका शर्मिला बाबर, अतुल भोंडवे, दिलीप मोरे, गुलाब वाल्हेकर, शंकर घोलप, नितीन बारणे, किशोर जाधव, राहुल वाणी, रोहन शहा, संदीप गोरे,विलास खांडेकर, आदी उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी स्वतः श्रमदान करून विविध प्रकारच्या 25 देशी वृक्षांची लागवड केली. तसेच या वृक्षांचे संगोपन घेण्याचा मनोदय व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.