Crime News : पीएमपीएल बस कंडक्टरला प्रवाश्याची धक्काबुक्की व मारहाण

एमपीसी न्यूज –   काळेवाडी फाटा बसस्टॉपजवळ पीएमपीएल बसमध्ये कंडक्टरला प्रवाशाने धक्काबुक्की व मारहाण केली.

याबाबत मनोज इंगावले, (वय 42 पीएमपीएल कंडक्टर, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. स्वप्निल चिमीगावे (वय 28 रा. काळेवाडी फाटा) या आरोपी विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी हे सीएनजी बस चिंचवडगाव ते वारजे माळवाडी करीता चिंचवडगाव स्थानकाहून प्रवाशांना घेऊन 26 जुलैला संध्याकाळी रवाना झाले होते. संध्याकाळी 7.50 वा चे सुमारास 16 नंबर बस स्टॉप ते काळेवाडी फाटा बस स्टॉप दरम्यान आरोपी इंगावले जोर जोरात बेल वाजवत आरडा ओरड करीत “तुम्हाला बस थांबवता येत नाही का” असे म्हणून फिर्यादी यांना धक्काबुक्की केली व हाताने मारहाण केली. तसेच दैनंदिन शासकीय कामकाज करीत असताना शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला यामुळे फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.