PMPML Bus Day – पीएमपीएलचा बस डे उत्साहात; विजेत्यांना मोफत पासचे वितरण

एमपीसी न्यूज – पीएमपीएलच्या 15 व्या वर्धापनदिनानिमित्त नुकतेच बस डे उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पीएमपीएमएलने ‘लकी ड्रा’ चे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना बुधवारी (दि. 4) पीएमपीएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पासचे वितरण करण्यात आले.

 

पीएमपीएलच्या वर्धापनदिनानिमित्त 14 ते 23 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि.18 एप्रिल रोजी ‘बस डे’ साजरा करण्यात आला. त्या दिवशी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रथमच ‘लकी ड्रा’चे आयोजन केले होते. त्याची सोडत वर्धापनदिनी काढून नावे घोषित करण्यात आली.

प्रथम क्रमांकासाठी वार्षिक मोफत पास,व्दितीय क्रमांकासाठी सहामाही मोफत पास आणि तृतीय क्रमांकासाठी त्रैमासिक मोफत पास तर उत्तेजनार्थ 14 प्रवाशांना त्रैमासिक मोफत पास देण्यात आला.

 

पीएमपीएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे वार्षिक मोफत पासच्या विजेत्या सुषमा भुजबळ तर उत्तेजनार्थ मोफत पासचे विजेते ऐश्र्वर्या पाटील,धीरज दुबे, आदित्य कुदळे व प्रविण कांबळे यांना प्रातिनिधिक स्वरूपात पास वितरीत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.