Nigdi : निगडी व्यापार संघटनेला भूखंड देण्यासाठी पीएमआरडीएकडून टाळाटाळ

एमपीसी न्यूज : निगडी व्यापारी संघटनेला रस्ता रुंदीकरणमध्ये जागा संपादित करून मिळाली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरनाणे रितसर सभा ठराव मंजूर करून ३८ गुंठे भूखंड, पेठ क्रमांक २४ या ठिकाणी दुय्यम सुविधा भूखंड क्रमांक ८/९ देण्यात आला होता.

Pcmc : महापालिकेच्या 388 जागांसाठी 55 हजार 82 जणांनी दिली परीक्षा, 15 दिवसात निकाल  

त्यानंतर दहा लाख रुपये दिनांक १५/२/२००६ रोजी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांना जमा करण्यात आले असून सुद्धा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भूखंड हस्तांतरित केलेले नाहीत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण  टाळाटाळ करत असून निगडी व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. लवकरात लवकर व्यापारी संघटनेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निगडीतील सचिन काळभोर यांनी केली आहे.

निगडी ते दापोडी रस्ता रुंदीकरणमध्ये १३२ व्यापारी यांच्या जागा रस्ता रुंदीकरणमध्ये संपादित करण्यात आल्या होत्या.  त्यावेळी अजित पवार ह्यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांना लेखी पत्राद्वारे मागणी करुन निगडी व्यापारी संघटना ह्यांना भूखंड देण्यात यावा म्हणून मागणी केली होती. त्या मागणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील लेखी पत्राद्वारे नवनगर विकास प्राधिकरणाकडे मागणी केली होती .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.