Pcmc : महापालिकेच्या 388 जागांसाठी 55 हजार 82 जणांनी दिली परीक्षा, 15 दिवसात निकाल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pcmc) विविध विभागांतील ब आणि क गटातील 388 जागांसाठी 55 हजार 82 जणांनी परीक्षा दिली आहे. युपीएससीच्या पूर्व परीक्षेला बसलेल्या 83 उमेदवारांची लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर 15 दिवसात निकाल जाहीर केला जाणार असल्याचे प्रशासन अधिकारी सोनम देशमुख यांनी सांगितले.

Pimpri : शहरात जोरदार पावसात उन्मळून पडली झाडे

राज्यातील 28 शहरात 98 केंद्रांवर टाटा कन्स्लटन्सी सर्विसेसच्या (टीसीएस) माध्यमातून तीन दिवस परीक्षा घेण्यात आली. यासाठी निरीक्षक म्हणून महापालिकेतील 98 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. 388 जागांसाठी 85 हजार 387 जणांनी अर्ज केले होते. प्रत्यक्षात 64.19 टक्के म्हणजेच 55 हजार 82 जणांनी परीक्षा दिली.

30 हजार 305 जणांनी अर्ज आणि शुल्क भरुन परीक्षा दिली नाही. सहाय्यक उद्यान अधिक्षक पदाचे आरक्षण रद्द झाल्याने या पदाची परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे या पदासाठी अर्ज केलेल्या 89 जणांना त्यांचे प्रवेश शुल्क परत देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.