Crime News : पोलिस कर्मचाऱ्याची लोणी काळभोर येथील राहत्या घरी आत्महत्या

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर पोलिस पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे सुनील नारायण शिंदे (वय- ४८, बक्कल नंबर ६५७६) यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घऱी गळफास लाऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

सुनील शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नसुन, लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. सुनिल शिंदे हे कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हदीतील कवडीमाळवाडी परिसरात राहत होते. काल रात्री नेहमीप्रणाने आपल्या खोलीत खोलीत झोपण्यास गेले होते. आज सकाळी अकराच्या सुमारास, त्यांनी पंख्याला खिडकीच्या पडद्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.