Bhosari Crime: करोडो रूपयांची फसवणूक व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज:  दोन अद्यात इसमांनी एकाची 1.38 करोड ची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. (Bhosari Crime) याबाबत हर्बन्ससिंग जब्बाल, वय 72 वर्षे, रा. सेक्टर 27अ, प्राधिकरण निगडी यांनी काल 27 जुलैला एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
मंगलदार बांगर, वय 47 वर्षे, रा. शिक्रापूर व रवींद्र सातपुते, रा. आकुर्डी या आरोपीच्या विरोधात भा. द. वी कलम 406, 420, 506(2), 34 सह आर्म ऍक्ट कलम 3(25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhosari Crime) आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचे यापिशिका कंपनीच्या विक्रीपोटी मिळालेल्या 1.38 करोड रक्कमेचा चेक फिर्यादीच्या संमतीशिवाय शिवाजीराव भोसले बँकेतील यापिशिका कंपनीच्या खात्यात जमा केला. फिर्यादीच्या संमतीशिवाय फिर्यादीच्या सह्या घेतलेल्या दोन चेकचा गैरवापर करून आरोपीच्या मित्रांच्या कर्जखात्यात सदरचे पैसे वर्ग करून फिर्यादीची फसवणूक केली आहे.

Chinchwad news: फत्तेचंद जैन विद्यालयात स्वर्गीय शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या 13 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

त्याबाबतीत फिर्यादीने खंडणी विरोधी पथक पुणे शहर येथे तक्रारी अर्ज दिला असता शिवाजीराव भोसले बँक येथे फिर्यादीच्या डोक्यास पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी देऊन वाद मिटला  तक्रारी अर्ज माघारी घेत आहे. (Bhosari Crime) अशा पत्रावर फिर्यादी यांची जबरदस्तीने सही घेतली त्यामुळे भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.