Chinchwad news: शंकरलाल मुथा यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज:  श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये गुरूवार 21 जुलै रोजी (Chinchwad News) संस्थेचे माजी ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या 13 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

या प्रसंगी जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव ऍड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सचिव श्री अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन जाप घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

श्री. फत्तेचंद जैन विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका मनीषा कलशेट्टी यांनी माननीय भाऊंच्या कार्याची माहिती चित्रफितीच्या आधारे सांगून आदरणीय भाऊंच्या स्मूतींना उजाळा दिला. (Chinchwad News) दंतचिकित्सा शिबिरामध्ये प्रसिध्द दंतचिकित्सक माननीय श्री विजयकुमारजी ताम्हाणे सर आणि दंततज्ञ माननीय सौ. सयूंक्ता रॉय खैरनार मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी प्रशालेतील 800 विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली.

 

याप्रसंगी विद्यालयाच्या माननीय प्राचार्या सुनिता नवले आणि विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी भाऊंचा स्वभाव, संस्थेप्रती जिव्हाळा आठवून पुण्यसमरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. (Chinchwad News) याप्रसंगी इयत्ता पाचवी चे विभाग प्रमुख माननीय संतोष शिरसाट आणि इयत्ता आठवी ते दहावीचे विभाग प्रमुख उमाकांत काळे उपस्थित होते. तसेच शिक्षक प्रतिनिधी मेघा नलावडे उपस्थित होत्या.  प्रशालेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.