Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन

एमपीसी न्यूज – अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन ( Poonam Pandey ) झाले आहे. ती  32 वर्षाची होती. 

Talegaon Dabhade : वेणुबाई वारींगे यांचे निधन

पूनम पांडेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत तिच्या टीमने तिच्या फॉलोअर्सना ही बातमी दिली.या पोस्टमध्ये म्हटलंय की, “आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली” .

पूनम पांडेला सर्वायकल कॅन्सर (Cervical cancer) अर्थात गर्भाशयाचा कर्करोग होता असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून अद्याप याविषयी पूनमच्या कुटुंबियांनी या बातमीची पुष्टी केलेली नाही. पूनम ही सरव्हायकल कॅन्सरच्या चौथ्या स्टेजला होती अन् नुकतंच तिला या आजाराबद्दल ( Poonam Pandey ) समजलं होतं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.