Poonam Pandey : पूनम पांडे जिवंत! प्रसिद्धीसाठी केले होते नाटक? नेटकऱ्यांचा सवाल

एमपीसी न्यूज : अभिनेत्री पूनम पांडे हिचे 2 फेब्रुवारी (Poonam Pandey ) रोजी निधन झाल्याची बातमी समोर आली. फार कमी वयात निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. परंतु, ही निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे. आणि ती जिवंत असल्याचा पुरावा स्वत: तीने समोर येऊन दिला आहे. शिवाय तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचेही तीने नाकारले आहे. परंतु, यामुळे तिच्यावर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. 

पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमी नंतर माध्यमे तिचे अंतिम संस्कार रेकॉर्ड करणारच होते परंतु, तिच्या मृतदेहाचा काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे ही बातमी खोटी असल्याचा संशय येऊ लागला. आणि पुढे तिनेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून जीवंत असल्याचे सांगितले.

पूनम पांडे म्हणाली, की तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वपूर्ण शेअर करत आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगही मला झालेला नाही. परंतु दुर्दैवाने, या रोगाचा (Poonam Pandey) सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांचे प्राण जातात. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे.

मुख्य गोष्ट HPV लस हा त्यावरील उपाय आहे. ही लस घेतल्याने कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही. गंभीर जागरुकतेने एकमेकांना सशक्त करूया आणि प्रत्येक स्त्रीला या पावलांची माहिती देऊया.  असे तीने या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.