Pune : आक्षेपार्ह नाट्य ललित कला मंचाला पडले महागात; प्राध्यापक, लेखकासह 6 जणांना पुणे पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले विद्यापीठात रामायणावरून (Pune) सादर करण्यात आलेले नाट्य ललित कला मंचाला आता चांगलेच महागात पडले आहे. पुणे पोलिसांनी आक्षेपार्ह नाट्य दाखवल्याप्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये  ललित कला केंद्राचे प्रमुख प्राध्यापक प्रवीण भोळेंनाही अटक करण्यात आली आहे. 

शुक्रवारी रात्री 2 फेब्रुवारी रोजी विद्यापीठात ललित कला मंच तर्फे जब वि मेट नाटक सादर करण्यात येत होते. परंतु, यावेळी लक्ष्मण (Pune) आणि सीता ही दोन भूमिका करणाऱ्या विद्यार्थ्यांना आक्षेपार्ह संवाद देण्यात आला होता तसेच सीतेची भूमिका साकरणारी व्यक्ती स्टेजवर सिगारेट पिताना दाखवण्यात आली. यामुळे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील पुणे पोलिसांकडे केली.

Poonam Pandey : पुनम पांडे जिवंत! प्रसिद्धीसाठी केले होते नाटक? नेटकऱ्यांचा सवाल

आज पुणे पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास घेऊन एकूण 6 जणांना अटक केली. यामध्ये 4 विद्यार्थी आणि विद्यार्थी असलेला नाटकाचा लेखक, दिग्दर्शक भावेश राजेंद्रन आणि ललित कला केंद्राचे प्रमुख प्राध्यापक प्रवीण भोळेंना अटक करण्यात आली आहे.

हा व्हिडिओ आज सकाळी सर्वत्र प्रसारित झाला असून यावर नेटकरी देखील संतापले असून सर्वत्र कारवाईची मागणी होत असल्याने पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.