Alandi : आळंदीतील एमआयटी कॉलेजमधील IT FEST 2024 स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : एमआयटी आर्ट्स , कॉमर्स आणि (Alandi) सायन्स कॉलेज, आळंदी मधील कंप्यूटर एप्लीकेशन विभागातर्फे (Intelligence Fest) “IT FEST 2024” स्पर्धा 30 आणि 31 जानेवारी रोजी घेण्यात आली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमधील तर्क करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता , शिकण्याची गती , मानसिक सतर्कता , संप्रेषण क्षमता व्यक्त करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती

. क्रीडा, अभ्यास, कार्यतत्परता, बुद्धिमत्ता, समय सूचकता या घटकांचा विचार करून बॉक्स क्रिकेट, लेट्स टॉक, BGMI,सेमी कॉलन , लेट्स प्ले, माईंड बॅटल इत्यादी स्पर्धांचा समावेश करण्यात आला. स्पर्धेत एमआयटी आर्ट्स,कॉमर्स आणि सायन्स कॉलेज,क्रिस्ट कॉलेज, एसएसपीएमएस, डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील लोहगाव, पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स गणेशखिंड, जी.एच. रायसोनी कॉलेज वाघोली, डॉ. डी.व्हाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पिंपरी, एटीएससी कॉलेज, एसएनबीपी मोरवाडी, डॉ. डी.व्हाय. पाटील इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट आणि रिसर्च अकुर्डी, जी.एच. रायसोनी इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेज, पुणे, एमआयटी अकॅडेमी ऑफ इंजीनियरिंग, (Alandi) पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी (फॉर लेडीज) मोशी, डॉ. डी.व्हाय.पाटिल इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्च पिंपरी, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स गणेशखिंड, आणि डॉ. डी.व्हाय.पाटिल इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्च ई. अशा विविध महाविद्यालयातील 900 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Pune : आक्षेपार्ह नाट्य ललित कला मंचाला पडले महागात; प्राध्यापक, लेखकासह 6 जणांना पुणे पोलिसांनी केली अटक

विभाग प्रमुख डॉ विकास महांडुळे यांनी स्पर्धकांचे व पाहुण्यांचे स्वागत केले आणि स्पर्धेबद्दल माहिती दिली. उपप्राचार्य अक्षदा मॅडम, प्राचार्य डॉ बी बी वाफारे यांनी मार्गदर्शन केले व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या तसेच स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.”IT FEST 2024″ च्या समन्वयक डॉ. प्रकाश राऊत यांनी नियोजन केले.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.