PCMC : महापालिकेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारीपदी प्रविण जैन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेचे नवनियुक्त मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रविण जैन यांनी पदभार स्वीकारला. नवनियुक्त मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या बदलीनंतर जैन यांची नियुक्ती झाली.

Maharashtra : महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 ची 9.79 टक्के दराने परतफेड

याआधी जैन मुंबई येथील डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे लेखा व वित्त अधिकारी म्हणून कार्यरत होते. या पदावर कार्यरत असताना शासनाकडून त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वित्त व लेखा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

जैन यांनी ग्राम विकास विभागात असताना प्रधान मंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपसचिव तथा वित्तीय नियंत्रक, उल्हासनगर महानगरपालिका येथे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागात अप्पर सचिव, रायगड येथे जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड जिल्हा परिषद येथे मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदांवर काम केलेले असून त्यांची प्रशासकीय विभागात २५ वर्षे सेवा झाली आहे.

https://youtu.be/a5tsOUp4Dkc?si=i8r_7vlprjYtvabu

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.