BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सामान्य पुणेकरांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – सामान्य पुणेकरांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार, असे नवनियुक्त पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर ते बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलत होते.

वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याची समस्या प्रामुख्याने सोडविण्यावर भर देणार आहे. पुणे शहरातील सार्वजनिक संस्थांची बैठकही घेणार आहे. येत्या 27 जानेवारीला बजेट मांडण्यात येणार आहे. त्यामध्ये मेट्रो, चांदनी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. अंदाजपत्रकात 2 हजार कोटींची तूट येण्याची शक्यता आहे, त्यावर विचारणा केली असता, छोट्या छोट्या गोष्टीतून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येईल. आकडेवारीचा अभ्यास करून लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार असेही गायकवाड म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like