Punawale News : उबेर शेअर बाईक चालकांना रिक्षा चालकांकडून गंभीर मारहाण, दोघांना अटक 

एमपीसी न्यूज – उबेर शेअर बाईक चालकांना रिक्षा चालकांनी गंभीर मारहाण करुन, पुन्हा उबेर शेअर बाईक मध्ये काम केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. साई मिलेनियम टॉवर, पुनावळे येथे शुक्रवारी (दि.04) दुपारी 12 ते 1 च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन रिक्षा चालकांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून, एक आरोपी फरार आहे.

शरण बसप्पा शामराव पांचाळ (वय 36, रा. पुनावळे) आणि हनुमंत बिभिषण माने (वय 23, रा. पुनावळे) असे अटक आरोपींची नावे आहेत. तर एक आरोपी फरार झाला आहे. अंकुश कृष्णा सुर्यवंशी (वय 26, रा. नवी सांगवी, मुळगाव – रा. घाणव, ता. पाटण, जि. सातारा) यांनी शुक्रवारी (दि.04) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=BuMYxA9l0-4&ab_channel=MPCNews

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षा चालकांनी फिर्यादी कृष्णा व उत्तम कर्डिले या दोघांना उबेर बाईक शेअर या मोबाईल ॲप्लिकेशनवरुन बोलावून घेतले. रिक्षा चालकांनी त्यांना धमकावले व ‘आम्ही उगीच रिक्षाचे परमिट काढतो का ? तू आमचे सिट घेऊन जातो,’ असे म्हणत लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी कृष्णा यांना एका आरोपीने सिंमेटचा ब्लॉक मांडीवर मारुन खाली पाडले व लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच, शर्टाची कॉलर पकडली व मोबाईलवर दगड टाकून तो फोडून टाकला. फिर्यादी कृष्णा यांना शिवीगाळ करून पुन्हा उबेर शेअर बाईक मध्ये काम केलंस तर जीवे मारु अशी धमकी दिली. तसेच उत्तम कर्डिले यांना देखील मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.