Sangavi News : 83 लाखांचे कर्जासाठी तारण असलेला बंगलो कर्जाची माहिती न देता विकला 

एमपीसी न्यूज – 83 लाखांचे कर्जासाठी तारण असलेला बंगलो कर्जाची कसलीही माहिती न देता विकल्याप्रकरणी बंगलो मालकाला अटक करण्यात आलीय. बंगलो नं. 2080, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी येथे मे 2017 रोजी हा प्रकार घडला. 

वसाराम नाथा चौधरी (रा. पुणे कॅम्प) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुरेखा शामराव पोळ (वय 45, रा. जुनी सांगवी) यांनी शुक्रवारी (दि.04) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=BuMYxA9l0-4&ab_channel=MPCNews
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसाराम चौधरी यांनी 83 लाखांचे कर्जासाठी तारण असलेला बंगलो कर्जाची कसलीही माहिती न देता फिर्यादी यांना विकला. महाराष्ट्र बॅंकेकडे हा बंगला तारण आहे याची पूर्वकल्पना न देता विक्री करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.