Pune : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून महापालिकेला 1200 पीपीई किट

1200 PPE kits from State Bank of India to MC

एमपीसी न्यूज – स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पुणे महापालिकेला गुरुवारी 1200 पीपीई किटचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी विविध प्रकारे योगदान देणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि सेवकांना सुरक्षिततेसाठी हे किट महत्वपूर्ण आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका उपायुक्त सुनील इंदलकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर उपस्थित होते.

सध्या संपुर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरात कोरोना प्रदूर्भावाचे संकट गडद होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन आणि पुणे महापालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवित आहे.

कोविड – 19 महामारीच्या संकट काळात सर्वच बँका ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने सामाजिक जाणीव ठेवून 1200 पीपीई किट महापालिकेला प्रदान केल्याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अभार मानले.

दरम्यान, सध्या कोरोनाच्या काळात विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी महापालिकेला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरात कोरोनाचे साडे पाच हजारांच्या वर रुग्ण झाले आहेत. जून महिन्यात तर कोरोनाचे 23 हजार रुग्ण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

हे संकट कमी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी, जिल्हा प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.