Pune : सत्यशोधक जागर करणे ही काळाची गरज- डॉ. बाबा आढाव

एमपीसी न्यूज- पुण्यात आर्थिक विषमता वाढली आहे. जसे धान्याला कोंब फूटते तसे प्रत्येक जातीला कोंब फुटलयाप्रमाणे नव्या पद्धतीने जात पुढे येत आहे. आज समतेची लढाई तीव्र बनली तरी आम्ही लढत आहोत. आजची परिस्थिती बघता सत्यशोधक जागर करणे ही काळाची गरज आहे. असे मत डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

सत्यशोधक विवाह केंद्रातर्फे विवाह केंद्राचे उद्घाटन व फलकाचे अनावरणचे आयोजन सत्यशोधक कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा. अंजली आंबेडकर, महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, किशोर ढमाले, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी अभिजित अनाप, ज्येष्ठ विचारवंत विद्या बाळ ,संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, शारदाबाई पवार कॉलेज बारामतीचे डॉ. राजाराम ढोक, युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत आदी उपस्थित होते.

डॉ. आढाव म्हणाले, "सत्यशोधक विचार काळाची गरज आहे. हे केंद्र महाराष्ट्रात पहिले कसब्यात सुरु झाले याचे मला खूप कौतुक आहे"

प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या, "आजची परिस्थिती निरनिराळ्या जाती उभी करणारी आहे. अशामध्ये सत्यशोधक विचार रूजवन्याचे काम हे केंद्र करत आहे" या कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने हा विचार पुढे जावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले. यावेळी महात्मा फुले यांच्या वेषात रघुनाथ ढोक यांनी सर्वांचे स्वागत आणि आकाश ढोक यांचा बाबा आणि प्रा.अंजली आंबेडकर समवेत वाढदिवस साजरा करून 223 मान्यवरांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ व सत्यशोधक जागर मासिक भेट दिले .या प्रसंगी सत्यशोधक आकाश ढोक, प्रतीक परदेशी, प्रवीण मोरे यांनी सत्यशोधक विवाह करण्यासाठी नोंद केली. शिल्पा शिवणकर हिने मुक्ता साळवेचा निबंध वाचला तर वैभव खेडेकर यानी शेतकऱ्यांनवरील कविता म्हटली. डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांचे अखंड सर्वांकडून कार्यक्रमाचे सुरवातीला म्हणून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास तोडकर तर आभार प्रदर्शन वामन वळवी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.