Pune : खडकवासला धरण साखळीत 45.93 टक्के,तर 13.39 टीएमसी इतका पाणी साठा जमा

धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात संततधार (Pune ) पाऊस सुरू आहे.सद्य स्थितीला खडकवासला धरण साखळीत 45.93 टक्के,तर 13.39 इतका पाणी साठा जमा झाला आहे.तर धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे.

Pune : गुरुवारी पाणी पुरवठा बंदचा पुणे महापालिकेचा निर्णय कायम

राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून पुणे शहर आणि आसपासच्या भागात देखील जोरदार पाऊस सुरू आहे.पण यंदा पावसाच प्रमाण कमी दिसत आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव,पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मिळून गतवर्षी आजच्या तारखेला 67.73 टक्के,तर 19.74 टीएमसी जमा होता.

तर यंदा आजच्या तारखेला 45.93 टक्के,तर 13.38 टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.तसेच मागील 24 तासात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने पाणी साठ्यात कमालीची वाढ होत आहे.

ही पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने समाधानाची बाब (Pune ) आहे.

धरण            आजच पाऊस   टीएमसी   टक्के
खडकवासला    2 मिमी          1.15     58.16
पानशेत            27 मिमी        5.15     48.40
वरसगाव           24 मिमी        5.96     46.46

टेमघर               30 मिमी        1.13     30.47

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.