Vadgaon Maval : रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर पार्किंग; रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या

एमपीसी न्यूज – वडगाव शहरात काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीरपणे कायमस्वरूपी (Vadgaon Maval ) पार्किंग केली आहे. यामुळे वाहतुकीसाठी अरुंद रस्ता शिल्लक राहत आहे. यामुळे वडगाव शहरात येणाऱ्या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याबाबत वडगाव शहर भाजपकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

Pune : खडकवासला धरण साखळीत 45.93 टक्के,तर 13.39 टीएमसी इतका पाणी साठा जमा

यावेळी माजी जि प सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसभापती, नगरसेवक प्रविण चव्हाण, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,भाजपाचे संघटन मंत्री किरण भिलारे, नगरसेवक, किरण म्हाळस्कर,रविंद्र म्हाळस्कर,ॲड विजय जाधव,खंडू भिलारे,अतुल म्हाळसकर,प्रशांत चव्हाण आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, वडगावमध्ये नव्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असल्यामुळे रस्ता काही भागात रुंद स्वरूपाचा झाल्याने, त्याचा गैरफायदा वाहन चालक घेताना दिसत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून स्मशानभूमी लगत दुतर्फा कायम स्वरूपी वाहने रस्त्यावर अवैधरित्या उभी केलेली आहेत.

ती हाटविण्याबाबत वडगाव शहर भाजपाने पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन दिले आहे.

Pune : कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांना वेग मर्यादा 40 कायम

यामध्ये नागरिकांची समस्या मांडताना,सदर स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी, दशक्रिया विधी यावेळेस बाहेरून येणारे वाहनाना पार्किंग सुविधा असून अडचण निर्माण होतं आहे.

त्या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला अवैधरित्या काही वाहने कायमस्वरूपी उभी केली असल्याचे दिसून येत आहे.

शाळेला जाणारी मुले, बाजारात येणाऱ्या महिला भगिनीं आणि बाजूला मारुती मंदिरात येणारे भाविक,जेष्ठ नागरिक तसेच टू व्हीलर वरून प्रवास करणारे सर्वच यांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एखादा मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

म्हणून काही दिवसापूर्वी नगरसेवक रविंद्र म्हाळसकर यांनी या विषया संदर्भात वडगाव नगरपंचायतला सुद्धा या विषयी कार्यवाही व्हावी म्हणून निवेदन दिले होते.

त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसल्याने आम्ही वडगाव शहर भाजपा आपलेकडे या संदर्भातील निवेदन देत आहोत, आपण या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेऊन संबंधित कायमस्वरूपी उभ्या असणाऱ्या वाहन चालकावर कार्यवाही करण्यात यावी अशी शहर अध्यक्ष अनंता कुडे यांनी निवेदनात म्हटले (Vadgaon Maval ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.