Pune : दिव्यांग खेळाडू ,दिव्यांगांचे प्रशिक्षक ,सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

'म्हाळू पार्वती प्रतिष्ठान' चा पाचवा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज- ‘म्हाळू पार्वती प्रतिष्ठान’ च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुण्यातील दिव्यांग खेळाडू ,दिव्यांगांचे प्रशिक्षक ,सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ .कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला डॉ कुमार सप्तर्षी, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, राजेंद्र गोळे ( जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग ), माजी नगरसेवक दत्ता बहिरट हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या दिव्यांग खेळाडूंचा गौरव करण्यात आला. त्यात चेतन चोपडा (व्हॉलीबॉल),रोहित सावंत (स्विमिंग),किरण गवांदे (हॅण्डबॉल),झुलेखा शेख (व्हॉलीबॉल ),कॅमी पटनायक (स्केटिंग ),सृष्टी बांदल (स्केटिंग ),हुजेफा शेख (स्केटिंग),अभिश्रुत देवकर (पॉवर लिफ्टिंग ),मनाली शेळके (पॉवर लिफ्टिंग ) यांचा समावेश होता.

दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या अशोक नांगरे, गिरीश भुजबळ, दैवत लिम्हण, अशोक जाधव, संतोष डोंगरे या प्रशिक्षकांची सत्कारही यावेळी करण्यात आला. सचिन पुणेकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ नागरिकांना गौरविण्यात आले .

याच कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या शाळांना बॅटरी वरील ध्वनिक्षेपण यंत्रणा, मोबाईल संच, ट्रॅक सूट, बॅग, प्रथमोपचार पेटी असा संच भेट देण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांनी स्वागत केले. निलेश निकम, प्रकाश निकम, पूनम हेंद्रे, डॉ . संजय जोशी, विलास निकम, बबन निकम, शैलेश हेंद्रे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. बाळकृष्ण नेरकर यांनी सूत्रसंचालन केले. निलेश निकम यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like