Talegaon Dabhade : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या प्रचाराचे नियोजन

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदार काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मावळ प्रचाराच्या नियोजनासाठी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक शुक्रवारी सकाळी तळेगाव येथे पार पडली. यामध्ये कार्यकर्त्यांना बूथ निहाय आणि प्रभाग निहाय जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.

या बैठकीला मावळचे निरीक्षक विजय कोलते, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, नगरसेवक किशोर भेगडे, तालुका युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, अध्यक्ष सुनील दाभाडे, कार्याध्यक्ष सुनील भोंगाड़े, मनोज येवले, तळेगाव राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आशीष खांडगे, सचिन भुम्बक, कैलास खांडभोर, चंद्रशेखर परचंड, विट्ठल जाधव, आकाश गायकवाड, विक्रम कलवडे, प्रमोद ठाकर, संदीप आंद्रे, प्रवीण शेडगे, अनंता ढवळे, गोरख बांगर, राजेश वाघोले, सुरेश चोरघे, अविनाश गराडे, नितीन बोडके, बाळासाहेब काजळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येनेे उपस्थित होते.

“पार्थ पवार हा तरुण असल्यामुळे युवकांनी मोठया संख्येने प्रचारत उतरणे गरजेचे आहे” असे विजय कोलते यावेळी बोलताना म्हणाले. किशोर भेगडे म्हणाले, “प्रचाराचे मुद्दे जनतेसमोर मांडा, तसेच खासदारांनी मागील पाच वर्षात काहीच कामे केली नाहीत. याची जाणीव मतदारांना करून द्या ” या वेळी कैलास गायकवाड, किशोर भेगड़े, सचिन घोटकुले यांनीही मनोगत व्यक्त केले. युवकांवर प्रचाराची मोठी जबाबदारी असून प्रत्येकाने आपल्या बूथचे नियोजन करून प्रत्येक बूथवर पंचवीस युवकांनी काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

बैठकीचे नियोजन जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले व तालुका युवक अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी केले. पुढील आठवड्यात युवक मेळावा घेण्याचे देखील नियोजन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.