Maval : राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार अन्‌ भाजप आमदार बाळा भेगडे यांची मतदानकेंद्रावर भेट

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळपासून मतदान सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांची तळेगाव दाभाडे येथे एका मतदान केंद्रावर भेट झाली. दोघांनीही हस्तांदोलन करत संवाद साधला.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. तळेगाव दाभाडे परिसरातील मतदार केंद्राबाहेर मतदारांची मोठी गर्दी झाली आहे.

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार मतदार केंद्रांना भेटी देत आहेत. तळेगावदाभाडे येथील नथुभाऊ भेगडे शाळेतील मतदान केंद्रावर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे आणि पार्थ पवार यांची भेट झाली. दोघांनीही हस्तांदोलन करत संवाद साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.