Pune : वेताळ टेकडीवर 500 झाडांचे रोपण

एमपीसी न्यूज- वटपौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी (दि. 16) पुण्यातील वेताळ टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. टाटा मोटर्सचे अधिकृत विक्रेते बाफना मोटर्स आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भूगोल फाउंडेशनच्या सदस्यांनी वृक्षारोपण, संगोपन, संवर्धन कसे करावे या विषयीं मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला आमदार मेधा कुलकर्णी, अॅपल सलुनच्या प्राची चोप्रा, कृषी विभाग अधिकारी डॅा.दिलीप झेंडे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर बाफना मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश परब, भूगोल फौंडेशनचे विठ्ठल वाळुंज व त्यांचे सहकारी, बाफना मोटर्सचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पिंपळ, वड, जांभूळ, लिंब ,तामण इत्यादी प्रकारची 500 झाडे लावण्यात आली. भूगोल फाऊंडेशनचे राजेश डहाके, निकुंज रेंगे, शरद दळवी, चंद्रकांत थोरात,समीर कालेकर, ऋषिकेश कोलते, चेतन डहाके, भारती डहाके, बकुल मंडालिया, स्नेहा मंडालिया, दिशा मंडालिया व लायन्स क्लब नवचैतन्य पुणेच्या अध्यक्षा गौरी गद्रे, दिलीप गायकवाड, सुनीता बिरादार, गंधर्व पोतदार, विनय सातपुते या सर्वांनी आलेल्या वृक्षप्रेमींना झाडे कशी लावावीत व त्यांचे संगोपन / संवर्धन कसे करावे या विषयीं माहिती देऊन मदत व प्रबोधन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.