Talegaon Dabhade : इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबळे या ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम यांनी स्वागत केले.

इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करणा-या विद्यार्थांची गावामधुन ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शोभाताई कदम यांनी शाळेतील समस्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. तसेच इयत्ता 1 लीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्याचे कौतुक करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुदाम कदम व भरत आंभोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत आंभोरे, सुदाम कदम, मुख्याध्यापक कांबळे, पालक व गावातील नागरिक उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.