Nigdi : क्रीडा शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – शाळेतील क्रीडा शिक्षकाने विद्यार्थ्याला खोलीत बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार जानेवारी 2019 मध्ये निगडी प्राधिकरण येथील एका नामांकित शाळेत घडला. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 14 वर्षीय पीडित मुलगा निगडी प्राधिकरण येथील एका नामांकित शाळेत शिक्षण घेतो. त्याच शाळेत संबंधित आरोपी क्रीडा शिक्षक म्हणून नोकरी करत होता. जानेवारी 2019 मध्ये त्याने पीडित मुलाला त्याच्या खोलीत बोलावून घेतले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच हा प्रकार कोणास सांगितल्यास त्याच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.