Pune : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला नायजेरियन इसम अटक

80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन इसमास औंध येथील स्पायसर कॉलेज जवळील रोडवर पोलिसांनी सापळा रचून काल गुरुवारी (दि.27) रात्री 3 च्या सुमारास अटक केली आहे. तसेच कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्याजवळून 80 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केेला आहे . जॅान्सन (रा.पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कॅम्प येथे एक नायजेरियन इसम कोकेन नावाचा अमली पदार्थ विकण्यासाठी रात्री 3 च्या दरम्यान येणार असल्याची माहिती पोलिसांना बातमीदारांकडून मिळाली.या माहितीची तपासणी करून पोलिसांनी सापळा रचून जॉन्सन नावाच्या तरुणाला स्पायसर कॉलेज औंध येथील सार्वजनिक रोडवर पकडून त्यांची अंगझडती घेतली.

यादरम्यान पोलिसांनी त्याच्या जवळून 42 हजार 500 रुपयांचा कोकेन नावाचा अंमली पदार्थ तसेच 10 हजार रुपये किमतीचा क्रिस्टल नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. त्याचबरोबर पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल, टीव्हीएस स्कूटी देखील जप्त केली.त्या नायजेरियन इसमाकडून पोलिसांनी एकूण 78 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून , पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंग आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल चव्हाण, पोलीस हवालदार पवन भोसले, राहुल शिंगे, सागर काळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.