Pune : भटक्या विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा

एमपीसी न्यूज – राज्याचे मुख्य निवडणूक (Pune) अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीसाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत चर्चा करुन जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, शेवराई सेवाभावी संस्थेचे नामदेव भोसले व क्रांती संस्थेच्या सुनीता भोसले आदी उपस्थित होते.

Mp Shrirang Barne : भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून अडीच कोटींचा निधी देण्याचा संकल्प

देशपांडे म्हणाले, पुणे जिल्ह्यात भटक्या विमुक्त जमातीसाठी शिरुर व इंदापूर तालुक्यात घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पारधी समाजाच्या मतदार नाव नोंदणीसाठी 18 जिल्ह्यांमध्ये काम सुरु आहे. त्यामुळे निश्चितच मतदार नोंदणी वाढेल. प्रत्येक तालुक्यात या जमातीच्या नागरिकांची यादी तयार करुन नाव नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,असेही ते म्हणाले. देशपांडे यांनी मतदार नाव नोंदणीसाठी येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

शिबीरांद्वारे भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांना (Pune) शिधापत्रिका, आधार कार्ड, जातीचे दाखले देण्याची सुविधाही देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले. अशा प्रकारची शिबीरे जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात येतील असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.